दैनिक गोमन्तक
मधामध्ये ॲंटीबॅक्टेरिअल गुणधर्म असतात. त्याचबरोबर मधाचा नैसर्गिक मॉश्चेरायझर म्हणून वापर करता येतो
त्वचेवरील तेलकटपणा दूर करण्यास मध उपयोगी पडतो.
त्वचेवरील काळे डाग घालवण्यास मधाचा वापर फायदेशीर ठरतो.
जर तुमची त्वचा खरबरीत झाली असेल तर हळद ,कॉफी( Coffee) आणि मधाचे मिश्रण तुमची खरबरीत त्वचा पूर्ववत होण्यास मदत करेल.
जर तुम्हाला बॅक्टेरिअल इनफेक्शन झाले असेल , त्याचबरोबर तुमच्या त्वचेची जळजळ होत असेल तर मध आणि हळद( Turmeric) एकत्र केलेला लेप तुमच्या त्वचेसाठी उपयुक्त ठरेल.
ज्यांची त्वचा तेलकट आहे. अशा लोकांनी मध, अंड्याचा पांढरा भाग आणि लिंबुचा रस यांचे मिश्रण 20 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावल्यास तेलकटपणा कमी होण्यास मदत होईल.
त्वचेवर असलेल्या काळ्या डाग घालवायचे असतील तर मध आणि ऑलिव्ह ऑईल यांचे एकसारखे प्रमाण घेऊन ते 20 मिनिटांसाठी त्वचेवर लावल्यास त्वचा डागविरहित होण्यास मदत होईल