देशातील 'या' शहरांमध्ये घरं झाली महाग, चेक करा लिस्ट

Manish Jadhav

जर तुमचाही घर घेण्याचा विचार असेल तर सावधान...! चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत घरांच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत घरे महाग झाली आहेत.

Building | Dainik Gomantak

देशातील 43 शहरांमध्ये घरांच्या किमतीत वाढ झाली आहे. त्याचवेळी, 7 शहरांमध्ये घरांच्या किमती कमी झाल्या आहेत. नॅशनल हाऊसिंग बँकेने बुधवारी याबाबत माहिती दिली.

Building | Dainik Gomantak

कर्जाचे दर अजूनही कमी आहेत

हाऊसिंग फायनान्स कंपन्यांच्या नियामकाने म्हटले आहे की, गृहनिर्माण कर्जाचे दर अजूनही महामारीपूर्व पातळीपेक्षा कमी आहेत.

Building | Dainik Gomantak

मालमत्तेच्या किमतीत वाढ

दरम्यान, या कालावधीत अहमदाबादमधील मालमत्तेच्या किमतीत 9.1 टक्के वाढ झाली आहे. त्याचवेळी, बंगळुरुमध्ये 8.9 टक्के आणि कोलकातामध्ये 7.8 टक्के वाढ झाली आहे.

Building | Dainik Gomantak

राजधानीत घरे किती महाग झाली आहेत?

घरांच्या किंमती निर्देशांकानुसार, चेन्नईमध्ये घरांच्या किमती 1.1 टक्के, दिल्लीत 0.8 टक्के, हैदराबादमध्ये 6.9 टक्के, मुंबईत 2.9 टक्के आणि पुण्यात 6.1 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

Building | Dainik Gomantak

गुरुग्राममध्ये सर्वात महागडी घरे

बँका आणि गृहनिर्माण वित्त कंपन्यांकडून गोळा केलेल्या मालमत्तेच्या मूल्यमापन मूल्यावर आधारित 50 शहरांच्या एचपीआयने 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत वार्षिक 4.8 टक्के वाढ दर्शविली.

Building | Dainik Gomantak

वर्षभरापूर्वी हा आकडा सात टक्के होता. या कालावधीत गुरुग्राममध्ये सर्वाधिक 20.1 टक्के वाढ झाली आहे. तर, सर्वाधिक घसरण लुधियानामध्ये (19.4 टक्के) दिसून आली.

Building | Dainik Gomantak