Akshata Chhatre
सौंदर्याची व्याख्या बदलली तरी निरोगी, नितळ त्वचेचं आकर्षण कधीच कमी झालं नाही.
त्वचेचं रक्षण
उन्हाळा असो की हिवाळा, त्वचेचं रक्षण करणं गरजेचं आहे.
महागड्या क्रीम्स, स्क्रब्स वापरूनही त्वचा निस्तेज, कोरडी किंवा मुरुमग्रस्त होते.
अशावेळी नैसर्गिक उपाय नेहमीच सुरक्षित ठरतात. हळदीपासून बनवलेला घरगुती साबण हा असाच एक सोपा पर्याय आहे.
हळदीतील अँटीसेप्टिक गुणधर्म त्वचेवरील जंतू नष्ट करून मुरुमं, टॅनिंग आणि सूज कमी करतात.
नारळ तेल आणि ग्लिसरीनमुळे त्वचा मऊ, ओलसर आणि तजेलदार राहते. या साबणात कुठलेही रसायन नसल्याने तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी योग्य आहे.
नियमित वापरामुळे चेहऱ्याला नैसर्गिक उजळपणा मिळतो आणि त्वचेचा नैसर्गिक तेजही टिकून राहतं.