Akshata Chhatre
वाढत्या गरमीच्या दिवसांत तुम्हाला तुमच्या त्वचेची काळजी घ्यायची आहे ना? नक्कीच घेतली पाहिजे. सध्या उन्ह एवढं वाढतंय ज्यात त्वचा भाजून निघते.
पण दररोज स्वतःवर एवढा खर्च कसा करावा असा प्रश्न सुद्धा पडू शकतो. मग अशावेळी काय कराल?
स्वतःची काळजी घेणं सोडून द्याल? नाही हा त्यावर पर्याय नाही. यापेक्षा काही अशा गोष्टी शोधा ज्या तुम्हाला घरच्या घरी बनवता येतील आणि मदत करतील.
आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी मोसंबीच्या सालींपासून सिरम कसं बनवता येईल हे सांगणार आहोत. अनेकवेळा काय होतं फळ खाताना आपण साल टाकून देतो पण असं करू नका.
काही संत्र्याच्या साली घ्या, त्यात लिंबाचा रस टाका, गुलाब पाण्यासह त्यात कोरफड टाका. तुम्हाला १-२ व्हिटॅमिन इ कॅप्सूल्सची सुद्धा गरज भासणार आहे आणि शेवटी या मिश्रणात ग्लिसरीन टाका.
लक्षात घ्या हे मिश्रण बनवताना संत्र्याच्या साली सुकवून घेतल्या पाहिजेत. पुढे याची पावडर बनवून हळूहळू एक एक गोष्ट त्यात मिक्स करा.
हे मिश्रण तुमच्या शरीराला हायड्रेटेड राहायला मदत करेल. गरमीच्या दिवसांत त्वचा रुक्ष होणार नाही आणि तुमची इतरांमध्ये उठून दिसाल.