दैनिक गोमन्तक
दिवसेंदिवस उष्णतेचा पारा वाढतच आहे. वाढत्या उष्णतेमुळे अनेकांना त्वचासंबंधी रोग, उष्माघात आणि इतर आजार बळावत आहेत.
वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचे प्रमाण वाढत आहे. जास्त वेळ उन्हात फिरल्याने, उभं राहिल्याने संपूर्ण एनर्जी संपून जाते.
त्यामुळे चक्कर, मळमळ यांसारखे प्रकार होतात. उष्माघातामुळे डिहायड्रेशनची समस्या निर्माण होते.
रोज एक चमचा कांद्याचा रस मधासोबत घेतल्यानेही उष्माघातापासून बचाव होतो.
उष्माघातापासून बचाव करण्यासाठी कांद्याचा रस सर्वोत्तम उपाय आहे.
आयुर्वेदात उष्माघातावर कांद्याचा रस सर्वात प्रभावी असल्याचे सांगितले आहे.
कांद्याचा रस कान, छाती आणि पायांवर लावण्याने उष्माघातापासून रक्षण करण्यास मदत होते.