Masala Tea Recipe: गुलाबी थंडी आणि वाफाळलेला चहा! घरीच मिळवा हॉटेलसारखी कडक अन् फक्कड चव; मसाला चहासाठी नक्की ट्राय करा 'ही' रेसिपी

Sameer Amunekar

मसाला चहासाठी साहित्य

मसाला चहा बनवण्यासाठी चहा पावडर, दूध, साखर, पाणी, आले, वेलची, दालचिनी, लवंग आणि काळी मिरी हे साहित्य घ्या.

Masala Tea Recipe | Dainik Gomantak

सर्वप्रथम मसाला तयार करा

आले, वेलची, दालचिनी, लवंग आणि काळी मिरी एकत्र घेऊन खलबत्त्यात जाडसर कुटून घ्या. यामुळे चहाला मसाल्याचा छान सुगंध आणि चव येते.

Masala Tea Recipe | Dainik Gomantak

पाण्यात मसाला उकळा

एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवा. त्यामध्ये तयार केलेला मसाला आणि ठेचलेले आले घाला. काही मिनिटे चांगले उकळू द्या.

Masala Tea Recipe | Dainik Gomantak

चहा पावडर घाला

पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर त्यात चहा पावडर घाला. चहाचा रंग गडद होईपर्यंत काही वेळ उकळू द्या. यामुळे चहाला कडक चव मिळते.

Masala Tea Recipe | Dainik Gomantak

दूध आणि साखर मिसळा

आता चहामध्ये आवश्यकतेनुसार दूध आणि साखर घाला. दूध मिसळल्यानंतर मंद ते मध्यम आचेवर चहा उकळू द्या.

Masala Tea Recipe | Dainik Gomantak

चहा चांगला उकळू द्या

चहाला दोन ते तीन वेळा छान उकळी येऊ द्या. मात्र, चहा उतू जाणार नाही याची काळजी घ्या. जितका चहा व्यवस्थित मुरेल तितकी त्याची चव खुलून येईल.

Masala Tea Recipe | Dainik Gomantak

तयार आहे कडक अन् फक्कड मसाला चहा!

आता गाळणीने चहा गाळून गरमागरम कपात ओता. गुलाबी थंडीत बिस्किटे किंवा खारीसोबत हॉटेलसारख्या कडक मसाला चहाचा मनमुराद आनंद घ्या!

Masala Tea Recipe | Dainik Gomantak

सुंदर आणि निरोगी त्वचेसाठी रोजच्या दिनचर्येत करा हे महत्त्वाचे बदल

येथे क्लिक करा