Akshata Chhatre
काही मुलींसाठी पाळीचा काळ अत्यंत वेदनादायक ठरतो पोटात खवखवणारी वेदना, कंबरदुखी, अंगदुखी, चिडचिड अशा समस्या या दिवसांना आणखी कठीण बनवतात.
पेनकिलर्स तात्पुरता आराम देतात, पण सतत त्यांचा वापर शरीरासाठी घातक ठरतो. अशावेळी आजीबाईंच्या बटव्यातला एक घरगुती उपाय उपयुक्त ठरतो.
ओवा, गूळ आणि तुपाचे लाडू हा नैसर्गिक आणि सुरक्षित पर्याय ठरतो.
आयुर्वेदतज्ज्ञांच्या मते, हे लाडू शरीरात उष्णता वाढवून पोटाच्या स्नायूंना आराम देतात आणि वातदोषावर काम करतात, ज्यामुळे पाळीच्या वेदना नैसर्गिकरित्या कमी होतात
ओव्याचे अँटी-स्पॅस्मोडिक व अँटी-इंफ्लेमेटरी गुण पोटातील सूज, ब्लोटिंग व गॅस कमी करतात, गूळ आयरनचा नैसर्गिक स्रोत असल्यामुळे पाळीच्या काळात येणारी कमजोरी, चक्कर व थकवा दूर करतो.
देशी तुप पचन सुधारून वात नियंत्रित करतं व स्नायूंना लवचिकता देऊन वेदना कमी करतं; याशिवाय, आल्याचा चहा शरीराला उष्णता देतो.
या साध्या पण प्रभावी घरगुती उपायांनी पाळीच्या वेदना केवळ कमीच होत नाहीत, तर पचन आणि हार्मोन्सच्या समतोलावरही सकारात्मक परिणाम होतो.