Sameer Amunekar
लिंबू कोपरावर चोळा, नंतर त्यावर साखर लावून हळुवारपणे मसाज करा. 10 मिनिटे ठेवा, नंतर कोमट पाण्याने धुवा. लिंबामध्ये असलेले सिट्रिक अॅसिड टॅन आणि डेड स्किन हटवते.
1 चमचा बेसन + 1 चमचा दही + चिमूटभर हळद मिसळा. हे मिश्रण कोपरावर लावून 15 मिनिटांनी धुवा. त्वचा उजळण्यास मदत करते.
बटाट्याचा रस काढून कोपरावर 10-15 मिनिटे लावा. नियमित वापराने काळेपणा कमी होतो.
ताजे एलोवेरा जेल कोपरांवर लावून हलक्या हाताने मसाज करा. त्वचेला मॉइश्चर आणि उजळपणा देतो.
1 चमचा नारळ तेलात ½ चमचा लिंबाचा रस मिसळा. कोपरांवर लावून 15 मिनिटांनी धुवा. त्वचा मऊ होते आणि काळेपणा दूर होतो.
हे उपाय 3-4 दिवस नियमित केल्यास उत्तम परिणाम दिसून येतात. अत्यधिक काळेपणा असल्यास त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या.