Akshata Chhatre
आजच्या काळात बाजारात हजारो सौंदर्यप्रसाधने, शॅम्पू, क्रीम्स, सिरम्स उपलब्ध आहेत.
पण आपल्या आजी–पणजींनी वापरलेले घरगुती उपाय आजही तितकेच परिणामकारक आणि सुरक्षित आहेत.
पूर्वी महागडे हेअर ऑईल नव्हते, पण खोबरेल तेल, बदाम तेल, आंबाड्याचं तेल यांचा वापर नियमित व्हायचा.
यामुळे केसांची मुळं मजबूत, केस गळती कमी होते आणि टक्कल पडण्याचा धोका कमी होतो.
आज बाजारात व्हिटॅमिन सी सिरम, फेस मास्क्स, स्क्रब्स असले तरी दह्याने त्वचा मऊ व उजळ बनते, हळदीमुळे अँटीबॅक्टेरियल प्रोटेक्शन मिळतं, बेसन स्किन क्लिन्झिंगसाठी उत्तम आहे
पूर्वी केस धुण्यासाठी शिकेकाई, रिठा आणि आवळा यांचा काढा वापरला जायचा. यामुळे केस अधिक मजबूत, मऊ आणि चमकदार बनतात.
पचनासाठी ओवा, हिंग आणि मध हा उपाय उत्तम आहे, यामुळे पचन सुधारतं,पोट हलकं राहतं हा एक नैसर्गिक, सुरक्षित उपाय आहे.