PCOS वर घरगुती उपाय; रामबाण औषध ठरतील 'या' बिया

Akshata Chhatre

पीसीओएस

स्त्रियांना भेडसावणाऱ्या अनेक आरोग्य समस्यांपैकी एक म्हणजे पीसीओएस (PCOS), ज्याला वैद्यकीय भाषेत ‘पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम’ असे म्हणतात.

PCOS home remedies | Dainik Gomantak

छोटे बदल

सुरुवातीला या लक्षणांकडे दुर्लक्ष होते, पण कालांतराने हे छोटे बदल जीवनशैलीवर मोठा परिणाम करतात. अनियमित मासिक पाळी, अनावश्यक केसांची वाढ, सततचा थकवा, वजन वाढ किंवा केस गळती यामुळे अनेक स्त्रिया त्रस्त असतात.

PCOS home remedies | Dainik Gomantak

हार्मोन्सचे असंतुलन

ही लक्षणं केवळ बाह्य नसून शरीरातील हार्मोन्सच्या असंतुलनामुळे निर्माण होतात.

PCOS home remedies | Dainik Gomantak

आहार आणि जीवनशैली

यावर कायमस्वरूपी औषध नसले तरी योग्य आहार आणि जीवनशैलीच्या माध्यमातून यावर नियंत्रण मिळवता येते.

PCOS home remedies | Dainik Gomantak

अळशीचे बीज

विशेषतः काही नैसर्गिक अन्नपदार्थ यात खूप प्रभावी ठरतात आणि त्यात अळशीचे बीज अग्रक्रमाने पुढे येते.

PCOS home remedies | Dainik Gomantak

नैसर्गिक लिग्नॅन्स

अळशीमध्ये असलेलेनैसर्गिक लिग्नॅन्स आणि ओमेगा-3 फॅटी ऍसिड हे हार्मोनल संतुलन राखण्यास मदत करतात, त्यामुळे अतिरिक्त अँड्रोजनची पातळी कमी होऊन त्वचेच्या समस्या आणि अनावश्यक केसांची वाढ नियंत्रित होते.

PCOS home remedies | Dainik Gomantak

इन्सुलिन रेझिस्टन्स

यासोबतच, अळशीतील फायबर भूक नियंत्रणात ठेवून वजन कमी करण्यास मदत करते आणि इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करून रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर राखते.

PCOS home remedies | Dainik Gomantak

मंत्रपुष्पांजली पूजेच्या शेवटीच का म्हटली जाते?

आणखीन बघा