Akshata Chhatre
आपल्यापैकी अनेकांना वाटतं की सुंदर, नितळ आणि तेजस्वी त्वचेसाठी महागडी स्किनकेअर प्रोडक्ट्सच हवीत, पण खरंतर आपल्या स्वयंपाकघरातच अशा काही साध्या गोष्टी आहेत ज्या त्वचेला नैसर्गिकरित्या सुंदर ठेवतात.
त्यातलीच एक सोपी, स्वस्त आणि परिणामकारक गोष्ट म्हणजे साखर.
साखर हा एक उत्तम नैसर्गिक स्क्रब आहे, जो मृत त्वचा पेशी दूर करतो, त्वचेला उजळ करतो आणि नैसर्गिक चमक देतो.
योग्य पद्धतीने आणि योग्य घटकांसोबत वापरल्यास साखर फक्त स्क्रब न राहता संपूर्ण स्किन ट्रीटमेंट ठरते.
१ चमचा साखर + १ चमचा मध एकत्र करा. हलक्या हाताने चेहऱ्यावर वर्तुळाकार मसाज करा, ५–१० मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा. साखर मृत पेशी काढते, मध संसर्ग रोखतो आणि त्वचेला नैसर्गिक ओलावा देतो.
१ चमचा साखर + अर्धा लिंबाचा रस घेऊन सौम्य मसाज करा. लिंबू त्वचेचा टॅन कमी करतो, रंग उजळवतो, पोत सुधारतो.जुळ्या मुलांची 'आई' व्हायचंय? विज्ञान काय सांगतं पाहा
१–२ चमचे साखर + खोबरेल तेल. शरीरावर सौम्य मसाज करा, मृत त्वचा काढून टाका, त्वचेला पोषण द्या. खोबरेल तेलामुळे त्वचा मऊ, हायड्रेट राहते, कोरडेपणा कमी होतो.