गोमंतक ऑनलाईन टीम
घरातील वस्तू जागेवर ठेवा. रोज थोडा वेळ दिल्यास पसारा वाढणार नाही.
स्वयंपाकानंतर ओटा पुसा आणि भांडी जास्त वेळ साचू देऊ नका.
सकाळी उठल्यावर बेड आवरा आणि कपडे योग्य जागी ठेवा.
सिंक, नळ आणि फरशी स्वच्छ ठेवा. ओलावा कमी ठेवल्यास दुर्गंधीही कमी होण्यास मदत होते.
फर्निचर, खिडक्या आणि पंख्यांवरील धूळ नियमित पुसा.
कपडे, खेळणी आणि घरातील छोट्या वस्तूंसाठी स्वतंत्र बॉक्स किंवा टोपल्या वापरा.
दररोजची छोटी कामे आणि आठवड्यातून एकदा करायची मोठी कामे वेगळी ठेवा.