प्रियांका चोप्राच्या जावेचा मोडला संसार; लग्नानंतर 4 वर्षातच घटस्फोट

गोमंतक ऑनलाईन टीम

हॉलीवूड अभिनेत्री

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हीची जाऊ आणि हॉलीवूड अभिनेत्री सोफी टर्नर हीने पतीपासून घटस्फोट घेतला आहे. तिचा पती ज्यो हा प्रियांकाचा पती निक जोनासचा सख्खा भाऊ आहे.

Sophie Turner | Instagram

4 वर्षांपुर्वी लग्न

सोफी आणि ज्यो जोनास यांनी 4 वर्षांपुर्वी लग्न केले होते. सोफीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.

Sophie Turner | Instagram

संयुक्त निवेदन

तिने स्वतः आणि ज्यो जोनास मार्फत एक संयुक्त निवेदन जारी केले आहे. त्यात आमच्या निर्णयाचा आदर राखावा असे म्हटले आहे.

Sophie Turner | Instagram

घटस्फोट

लग्नानंतरच्या चार सुंदर वर्षानंतर आम्ही दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्या निवेदनात म्हटले आहे.

Sophie Turner | Instagram

खासगी मुद्दा

आम्ही आमच्यातील लग्नाचे नाते संपुष्टात आणले आहे. बातम्यांमधून बरीच काही चर्चा होत आहे. पण हा आमचा खासगी प्रश्न आहे, असेही त्यात म्हटले आहे.

Sophie Turner | Instagram

सहमतीने निर्णय

आम्ही सहमतीने हा निर्णय घेतला आहे. सर्वांनी आमच्या खासगीपणाचा आदर करणे हेच आमच्यासाठी आणि आमच्या मुलांसाठी चांगले ठरेल.

Sophie Turner | Instagram

अंगठी घालणे केले बंद

गेल्या काही दिवसांपासून सोफी बोटात अंगठी घालत नव्हती. तसेच ज्यो आणि तिच्यात सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चा गेल्या काही काळापासून सुरू होत्या.

Joe Jonas - Sophie Turner | Instagram
Nayanthara | Dainik Gomantak