Pranali Kodre
भारतात 13 ते 29 जानेवारी दरम्यान हॉकी वर्ल्ड कप खेळवण्यात येणार आहे.
हा 15 वा हॉकी वर्ल्ड कप असून यंदा भारतीय संघ तब्बल 48 वर्षांनी दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्यासाठी प्रयत्न करेल.
भारताने यापूर्वी 1975 साली पहिल्यांदा हॉकी वर्ल्ड कप जिंकला होता.
आत्तापर्यंत पाकिस्तानने सर्वाधिक 4 वेळा हॉकी वर्ल्डकप जिंकला आहे. त्यांनी 1971, 1978, 1982 आणि 1994 साली विजेतेपद मिळवले आहे.
तसेच नेदरलँड्स आणि ऑस्ट्रेलिया संघांनी प्रत्येकी 3 वेळा वर्ल्डकप नावे केला आहे.
नेदरलँड्सने 1973, 1990 आणि 1998 साली हॉकी वर्ल्डकप जिंकला आहे.
ऑस्ट्रेलियाने 1986, 2010 आणि 2014 साली हॉकी वर्ल्डकप जिंकला आहे.
तसेच जर्मनीने 2002 आणि 2006 असे दोन वेळा हॉकी वर्ल्डकपवर आपले नाव कोरले आहे.
बेल्जियम गतविजेते असून त्यांनी 2018 साली पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकला होता.