Akshata Chhatre
मुलांना शिकवा की तक्रार न करता प्रयत्न करणं, अपयशावर मात करणं आणि नेहमी सकारात्मक राहणं हेच यशाचं गमक आहे.
सकारात्मक स्व-संवादामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो, ते नकारात्मक विचारांपासून दूर राहतात.
मुलांच्या भावना समजून घ्या, त्यांचं ऐका आणि संवाद साधा. त्यांना सांगत रहा की ते जसे आहेत तसेच खास आहेत.
एखाद्या स्पोर्ट्स टीममध्ये जागा न मिळाल्यास त्यांना सांगा: “सतत प्रयत्न केलास तर नक्की यश मिळेल.”
मुलांना स्वतःबद्दल दररोज ५ चांगल्या गोष्टी लिहायला सांगा त्यामुळे आत्मचिंतन आणि आत्मविश्वास वाढतो.
जर मुलांना वर्गात बोलायला भीती वाटत असेल, तर त्यांना घरी आरशासमोर सराव करायला सांगा हा सराव आत्मविश्वास देतो.