Akshata Chhatre
अनेकदा पालक रागाच्या भरात आपल्या मुलांवर हात उचलतात. मूल जेवत नसेल, अभ्यास करत नसेल किंवा हट्टीपणा करत असेल, तर त्याला मारहाण करणे ही एक सामान्य गोष्ट मानली जाते.
पण या वागण्याचे मुलांच्या मानसिक आरोग्यावर आणि व्यक्तिमत्त्वावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
मुले मोठ्यांकडूनच शिकतात. जर तुम्ही त्यांना मारहाण केली, तर त्यांना असे वर्तन योग्य वाटू लागते.
मारहाणीमुळे मुलांच्या मनात भीती निर्माण होते आणि त्यांना एकटेपणाची भावना जाणवते. तुम्ही नंतर कितीही प्रेम दाखवले तरी त्यांच्या मनातील ही भीती पूर्णपणे जात नाही.
मुलांना शिस्त लावण्यासाठी मारहाण केली जाते, पण अनेकदा यामुळे मुले अधिक हट्टी आणि आक्रमक बनतात. त्यांना असे वाटते की मार खाणे ही एक सामान्य गोष्ट आहे आणि ते ऐकणे टाळतात.
सततच्या मारहाणीमुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. त्यांना स्वतःबद्दल वाईट वाटू लागते आणि त्यांचा आत्मविश्वास कमी होतो.
मुलांना शिस्त लावण्यासाठी मारहाण हा योग्य उपाय नाही. त्याऐवजी तुम्ही त्यांना प्रेमाने समजावून सांगू शकता.