Pranali Kodre
रोहित शर्माने 24 जानेवारी 2023 रोजी न्यूझीलंडविरुद्ध इंदोरला झालेल्या सामन्यात वनडे कारकिर्दीतील 30 वे शतक केले.
त्याने त्याच्या वनडेतील 30 व्या शतकी खेळीदरम्यान 6 षटकार मारले.
त्यामुळे रोहित वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या पहिल्या तीन फलंदाजांमध्ये दाखल झाला आहे.
रोहितच्या नावावर आता 241 वनडे सामन्यांत 273 षटकारांची नोंद झाली आहे.
रोहित आता वनडेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.
त्याने सनथ जयसूर्याच्या 270 षटकारांच्या विक्रमाला मागे टाकले आहे. त्यामुळे जयसूर्या आता या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
वनडेमध्ये सध्या सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम शाहिद आफ्रिदीच्या नावावर आहे. त्याने 398 वनडेत 351 षटकार मारले आहेत.
तसेच या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ख्रिस गेलने 301 वनडेत 331 षटकार मारले आहेत.
वनडेत 300 पेक्षा जास्त षटकार केवळ शाहिद आफ्रिदी आणि ख्रिस गेल या दोघांनाच मारता आले आहेत.