Akshata Chhatre
गोवा म्हटलं की आपल्याला फक्त पोर्तुगीज राजवट आठवते, पण तुम्हाला माहितीये का गोव्यावर पोर्तुगीजांच्या आधी देखील एक राजवट होती.
कित्येक वर्षांपूर्वी ही राजवट गोव्यावर राज्य करायची, पण तो राजा कोण? ही राजवट कधीपासून सुरु झाली आणि कशी संपली?
कधी गोव्याच्या तांबडी सुर्लाच्या देवळाला कधी भेट दिली आहे का? हो तर ते मंदिर कदंबकालीन आहे. गोव्यावर कैक वर्षांपूर्वी कदंब राजवट होती.
१० व्या शतकापासून ते १४ व्या शतकापर्यंत गोव्यात कदंब राजवटीचं राज्य होतं. तेव्हा गोवा गोपकपट्टण या नावानं ओळखला जायचा.
असं म्हणतात गोवा ही कदंब राजाची राजधानी होती. गोव्याला हे नाव मिळालं तरी कसं?
कदंब राजा जयकेशी Iच्या ताम्रपटात बंदर शहरावरून हे नाव पडल्याचं दिसून येतं.
प्राचीन साहित्यात गोव्याला गोमंचला, गोपकपट्टम, गोपकापुरी, गोवापुरी, गोवे आणि गोमंतक या नावांनीही ओळखले जाते.