Pranali Kodre
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत 15 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानने मोठा उलटफेर करत गतविजेत्या इंग्लंडला पराभवाचा धक्का दिला.
दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या वर्ल्डकपच्या सामन्यात अफगाणिस्तानने इंग्लंडविरुद्ध 69 धावांनी विजय मिळवला.
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील हा अफगाणिस्तानचा पहिला विजय होता. तसेच अफगाणिस्तानसाठी हा विजय ऐतिहासिक ठरला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा अफगाणिस्तानचा इंग्लंडविरुद्धचा पहिलाच विजय आहे.
तसेच वनडे वर्ल्डकपमधील अफगाणिस्तानचा हा केवळ दुसरा विजय आहे. अफगाणिस्तानने यापूर्वी वनडे वर्ल्डकपमध्ये स्कॉटलंडविरुद्ध 2015 वर्ल्डकपमध्ये विजय मिळवला होता.
याशिवाय अफगाणिस्तानची वनडे वर्ल्डकपमधील पराभवाची मालिकाही अखेर संपली आहे. वर्ल्डकपमध्ये तब्बल 14 पराभवांनंतर अफगाणिस्तानला विजय मिळला आहे.
तसेच अफगाणिस्तान पहिला संघ बनला, ज्यांच्या फिरकीपटूंनी वर्ल्डकपमध्ये इंग्लंडच्या 10 पैकी 8 विकेट्स घेतल्या.
अफगाणिस्तानने या सामन्यात इंग्लंडसमोर 285 धावांचे आव्हान ठेवले होते, या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 40.3 षटकात 215 धावांत सर्वबाद झाला.