Pranali Kodre
आयपीएलच्या इतिहासात 2022 पर्यंत 6 खेळाडूंनी 100 कोटींपेक्षाही अधिक कमाई केली आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने सर्वाधिक 165 कोटी रुपयांची कमाई आयपीएलमधून केली आहे.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने 163 कोटी रुपये कमावले आहेत.
रॉयल चॅलेंजर्सचा प्रमुख खेळाडू विराट कोहलीने आत्तापर्यंत 158 कोटी रुपये कमावले आहेत.
या यादीत सुरेश रैना चौथ्या क्रमांकावर असून त्याने 111 कोटी रुपये कमावले आहेत.
एबी डिविलियर्स आयपीएलमध्ये सर्वाधिक कमाई करणारा परदेशी खेळाडू आहे. त्याने 103 कोटी रुपये कमावले आहेत.
वेस्ट इंडिजचा सुनील नारायणदेखील या यादीत असून त्याने 101 कोटी रुपये कमावले आहेत.