Pranali Kodre
ऍशेस 2023 मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने 2 विकेट्सने विजय मिळवला.
एजबॅस्टनला झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांनी 9 व्या विकेटसाठी नाबाद 55 धावांची भागीदारी केली आणि ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.
त्यामुळे कसोटीत धावांचा यशस्वी पाठलाग करताना 9 व्या विकेटसाठी केलेली ही चौथी सर्वोच्च भागीदारी ठरली.
कसोटीत धावांचा यशस्वी पाठलाग करताना 9 व्या विकेटसाठी सर्वोच्च धावांची भागीदारी करण्याचा विक्रम व्हीव्हीएस लक्ष्मण आणि इशांत शर्माच्या नावावर आहे.
लक्ष्मण आणि इशांत यांनी 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहाली कसोटीत २१६ धावांचा यशस्वी पाठलाग करताना 9 व्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली होती.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचे जेफ डुजोन आणि विन्सटन बेंजामिन असून त्यांनी पाकिस्तानविरुद्ध ब्रिजटाऊन येथे १९८८ मध्ये २६६ धावांचा यशस्वी पाठलाग करताना ९ व्या विकेटसाठी नाबाद ६१ धावांची भागीदारी केली होती.
तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या गर्वी हाझलिट आणि अलबर्ट कॉटर यांनी ऑस्ट्रेलियाकडून १९०७ साली सिडनीत इंग्लंडविरुद्ध २७४ धावांचा यशस्वी पाठलाग करताना ९ व्या विकेटसाठी ५६ धावांची नाबाद भागीदारी केली होती.
तसेच कमिन्स आणि लायन यांच्यानंतर या विक्रमाच्या यादीत पाचव्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचे ब्रायन लारा आणि कर्टली अँब्रोस यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिजटाऊनमध्ये १९९९ मध्ये ३०८ धावांचा यशस्वी पाठलाग करताना ९ व्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली होती.