Akshata Chhatre
आपण कितीही महागड्या क्रीम्स वापरल्या, स्किन ट्रीटमेंट्स केल्या किंवा सौंदर्य प्रसाधनांवर पैसे खर्च केले, तरी शरीराची आणि त्वचेची खरी चमक आतूनच येते.
त्यामागचा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. पाणी केवळ तहान भागवत नाही, तर शरीर, पचन, त्वचा आणि मानसिक स्वास्थ्य या सगळ्याचं मूळ आहे.
फक्त पाणी प्यायचं इतकंच नाही, तर कसं आणि कधी प्यायचं हेही तितकंच महत्त्वाचं आहे.
पाणी पिण्याच्या काही साध्या नियमांचं पालन केल्याने वयाच्या चाळीशीतही पंचविशीसारखी त्वचा राखता येते. सर्वप्रथम, सकाळी उठल्यावर चहा किंवा फोनऐवजी पाण्याने दिवसाची सुरुवात करा.
पोट रिकामं असताना प्यायलेलं कोमट पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतं, पचनक्रिया सक्रिय करतं आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तेज आणतं.
दुसरं महत्त्वाचं म्हणजे पाणी नेहमी हळूहळू, एक एक घोट घेत प्यावं. घाईत किंवा उभं राहून वेगाने पाणी प्यायल्याने पचनावर ताण येतो
तिसरं, उन्हाळ्यात फ्रिजचं अतिशय थंड पाणी प्यायल्याने तात्पुरता आनंद मिळतो, पण पचनक्रिया मंदावते आणि शरीरातील उष्णतेचं संतुलन बिघडतं.