Kavya Powar
हृदयविकाराचा धोका आता लहान मुलांमध्येही दिसून येतो.
हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका लहान मुलांमध्ये का वाढत आहे हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, काही मुलांना जन्मापासूनच हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो.
जेव्हा आई गरोदर असते, तेव्हा मुलांना जन्मजात हृदयविकाराचा धोका निर्माण होतो आणि त्यांना आयुष्यभर त्याच्यासोबत राहावे लागते.
जन्मत:च निरोगी असलेली मुलेही हृदयविकाराचे बळी ठरत आहेत. यामागे पालकांचा निष्काळजीपणाही कारण असू शकतो.
मुलांसमोर धुम्रपान, खाण्या-पिण्यात निष्काळजीपणा, अस्वास्थ्यकर जीवनशैली, मुलांना खेळासाठी न पाठवणे अशा अनेक कारणांमुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
त्यामुळे लहान वयातच रक्तदाब, शुगर, कोलेस्टेरॉल यासारखे आजार मुलांमध्ये दिसून येत असून त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.