Akshata Chhatre
दिवाळीचा सण मित्र-परिवारासोबत एकत्र साजरा करण्याचा आनंद काही वेगळाच असतो
या काळात पाहुण्यांसाठी उत्तम ड्रिंक्स तयार करणे महत्त्वाचे आहे.
आरोग्याचा विचार करून, यावेळी अल्कोहलपासून दूर राहा आणि या ५ जबरदस्त नॉन-अल्कोहोलिक ड्रिंक्सने सगळ्यांचे मन जिंका
अँटीऑक्सिडंट्सनी भरलेले अनार जिंगर, ज्याची चटपटीत चव सर्वांना आवडेल
तळलेल्या स्नॅक्ससाठी थंडगार ताक, जे पोटासाठी टॉनिकसारखे काम करते,जर काही खास आणि दिसायला आकर्षक बनवायचे असेल तर गुलाब फालूदा मिल्कशेक एक उत्तम पर्याय आहे.
याशिवाय, पार्टीला एनर्जी देण्यासाठी कीवी सोडा पंच आणि आरोग्यासाठी टॉनिकसारखे बदाम खजूर शेक देखील मेन्यूमध्ये समाविष्ट करा.
ही ड्रिंक्स फक्त चवीलाच चांगली नाहीत, तर पचन आणि ताजेपणा देण्यासाठीही लाजवाब आहेत, ज्यामुळे तुमची दिवाळी पार्टी अविस्मरणीय बनेल.