Puja Bonkile
पुरुषांनी आहारात अशा काही भाज्यांच्या समावेश करावा ज्या पुरुषांसाठी एनर्जी बुस्टर Energy Booster आहेत.
पुरुषांना निरोगी आणि तंदूरुस्त राहायचं असले तर त्यांनी आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा अधिक समावेश करणं गरजेचं आहे
पालकामध्ये अनेक प्रकारची पोषक तत्वं आहेत.
पालकामध्ये विटामिन के देखील आढळतं. Vitamin K शरीरात कॅल्शियम सोशन घेण्यास मदत करत यामुळे हाडं मजबूत होतात.
रोगप्रतिकारक शक्ती वाढून आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करते.
पालक खाल्ल्याने शरीराला विटामिन ए मिळतं. ज्यामुळे डोळ्यांची दृष्टी चांगली होण्यास मदत होते.
पालकामध्ये मुबलक प्रमाणात फायबर असल्याने लवकर भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहते.
हृदयासाठी आणि रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी आवश्यक असलेलं ओमेगा-३ फॅटी ऍसिड पालकामध्ये आढळतं.
यामुळे पालकच्या सेवनाने पुरुषांमध्ये निर्माण होणाऱ्या हृदयासंबधीत आजारापासून दूर राहणं शक्य आहे.