दैनिक गोमन्तक
सकाळचा नाश्ता हा नेहमी पचन्यासाठी हलका आणि प्रोटीन्स युक्त असणारा केला पाहिजे.
बरेच लोक सकाळी नाश्ता करणे टाळतात, परंतु, सकाळचा नाश्ता कधीच टाळू नये.
नाश्ता केल्याने दिवसभरासाठी कॅलरीज मिळतात आणि पचनक्रिया देखील सुधारते, त्यामुळे ऑफिसच्या कामातही उत्साह टिकून राहतो.
हेल्दी नाश्त्यात पनीर भुर्जी हा एक उत्तम पर्याय आहे, पनीरमध्ये टोमॅटो, कांदा, शिमला मिरची टाकून त्याची भुर्जी करुन मल्टीग्रेन ब्रेडसोबत खाऊ शकता.
अंड्यांमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते, अंडी उकडून किंवा त्याची पोळी बनवून ब्रेडसोबत ट्राय करा.
तांदूळ किंवा रव्याच्या इडलीऐवजी ओट्सची इडली बनवून ही इडली सांबार आणि नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता.
पौष्टिक असा सोया उत्तपमही एकदा ट्राय करुन बघा त्यासाठी सोया पीठामध्ये पाणी मिसळून तव्यावर उत्तपम बनवू शकता.
चहा आणि कॉफी पिणे शरीरासाठी चांगले नसते, तर तुम्ही चहा-कॉफीऐवजी प्रोटीन शेक पिऊ शकता.
प्रोटीन शेकमध्ये केळी, सफरचंद, बदाम, काजू यांसह दूध मिसळून त्याचा शेक बनवून पिऊ शकता.