दैनिक गोमन्तक
आपले आरोग्य नेहमीच चांगले राहण्यासाठी काळजी घेण्याची गरज असते.
जगभरात कमी वयात हृदयविकाराचा झटका येण्याने मृत्यूचे प्रमाण खूप वाढले आहे.
हृदयविकाराचा झटक्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागतो, त्याचा धोका टाळण्यासाठी त्याची लक्षणे आधीच ओळखता येऊ शकतात.
हृदयविकाराचा झटका येण्याच्या चार आठवडे आधी काही संकेत मिळतात.
तेलकट पदार्थांमुळे रक्तात कोलेस्टेरॉल जमा होण्याने रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज होते, त्यामुळे हृदयापर्यंत रक्त पोहोचत नाही.
हृदयविकारचा झटका कधीही अचानक येत नाही, समस्या हाताबाहेर गेल्यावरच मोठा धक्का बसतो.
महिलांवर नुकतेच एक संशोधन करण्यात आले, ज्यात हृदयविकाराच्या झटक्याच्या चार आठवडे आधी शरीर धोक्याचे संकेत देत असते.
तसेच हृदयाची धडधड अधिक वाढणे, भूक न लागणे, हात आणि पायांना मुंग्या येणे, रात्री श्वास लागणे धाप लागणे अशी लक्षणे असतात.
झोप न लागणे, अपचनाचा त्रास होणे, नैराश्याता जास्त जाणवने, नजर कमजोर होणे अशी लक्षणे वाटू लागल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे.