Puja Bonkile
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हळदीचा वापर केला जातो.
जर ते जास्त प्रमाणात सेवन केले गेले तर तुम्हाला समस्या देखील होऊ शकतात.
मधुमेहींनी हळदीचा अतिवापर करु नये.
हळदीमध्ये आढळणारे क्युरक्यूमिन फायदेशीर असले तरी त्याचे जास्त प्रमाण किडनीच्या रुग्णाला त्रास देऊ शकते.
जर तुम्ही जास्त हळद खात असाल तर स्टोनची समस्या अधिक गंभीर होते.
हळद रक्त गोठण्याची प्रक्रिया मंदावते. म्हणूनच ज्या लोकांना नाकातून अचानक किंवा सतत रक्त येण्याची समस्या आहे त्यांनी हळदीचे सेवन करू नये.
हळदीमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाहावर परिणाम होतो. शरीरात अशक्तपणाची तक्रार असल्यास हळद खाणे टाळा.