Manish Jadhav
सध्या वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही-लाही होत आहे. जेवण कमी आणि पाणी पिणे जास्त प्यायले जात आहे. त्यामुळे उन्हाळ्यात आरोग्याच्या काळजीबरोबर आहाराकडे बिलकुल दुर्लक्ष करु नका.
दरम्यान, मांसाहाराशिवाय अनेकांचा दिवस पूर्ण होत नाही. मग कोणताही ऋतु असो त्यांना मांसाहार केल्याशिवाय चैन पडत नाही. मात्र, उन्हाळ्यात जास्त प्रमाणात मांसाहार केल्यास आरोग्याला गंभीर नुकसान होऊ शकते.
उन्हाळ्यात अंडी, मांस-मासे किंवा चिकन-मटण खाल्ल्याने शरीराचे तापमान वाढू शकते.
आज (14 एप्रिल) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून उन्हाळ्यात जास्त प्रमाणात मांसाहार केल्यास शरीरावर काय विपरित परिणाम होतात याविषयी जाणून घेणार आहोत...
उन्हाळ्यात जास्तप्रमाणात मांसाहार केल्यास पचनाची समस्या उद्भवते. उन्हाळ्यात प्रथिनेयुक्त पदार्थ पचण्यास कठीण असतात.
मांसाहारी पदार्थ गरम अन्न मानले जातात. ते शरीरात उष्णता निर्माण करण्याचे काम करतात. त्यामुळे उन्हाळ्यात अजिबात मांसाहाराचे सेवन करु नका.
उन्हाळ्यात बॅक्टेरिया वेगाने वाढतात. जर मांसाहारी पदार्थ व्यवस्थित शिजवले नाहीतर अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढतो.
उन्हाळ्यात जास्त प्रमाणात मांसाहाराचे सेवन केल्यास त्वचेची समस्या उद्भवू शकते.