Ganeshprasad Gogate
रोज पहाटे प्राणायाम, शिर्षासन असे व्यायाम केल्याने मेंदूच्या दिशेने रक्तप्रवाह सुरळीत सुरु राहून ताजेतवाने वाटते.
बदाम, हिरव्या पालेभाज्यांमुळे मेंदूची कार्यप्रणाली निरोगी राहते, असं तज्ञ सांगतात.
टोमॅटोचं सेवन
मेंदूच्या आरोग्यासाठी टोमॅटोचं सेवन उपयुक्त ठरते. टोमॅटोची भाजी, सूप आदी पदार्थांचा आहारात समावेश करावा.
बदाम आणि अक्रोड
ड्रायफ्रुट्समध्ये हेल्दी फॅट आणि प्रोटिन मुबलक असल्याने रोज बदाम आणि अक्रोडचे सेवन करावे. यासाठी अक्रोड व बदाम रात्री भिजत ठेऊन सकाळी खाणे उत्तम.
चहा आणि कॉफी
चहा आणि कॉफीतील कॅफिनमुळे मेंदू ताजातवाना राहत असल्याचे एका संशोधनानुसार समोर आलंय. मात्र चहा-कॉफी मर्यादित घेणं गरजेचं आहे.
पालेभाज्या
हिरव्या पालेभाज्या आरोग्याच्या दृष्टीनं फायदेशीर असतात. या भाज्यांचे नियमित सेवन केल्यास आपली स्मरणशक्ती सुधारते तसेच मेंदूचे आरोग्य देखील उत्तम राहते.