दैनिक गोमन्तक
निरोगी त्वचा आणि केसांसाठी लॅव्हेंडर तेलाचा वापर करु शकतात.
कॅरियर ऑइलमध्ये लॅव्हेंडर तेल मिक्स करुन लावल्याने केस गळती थांबेल आणि केसांची वाढही चांगली होईल.
लॅव्हेंडर तेल हे केवळ केसांसाठीच नाही तर त्वचेकरीता देखील चांगले आहे.
लॅव्हेंडर तेलाचा वापर अरोमाथेरपी, मसाज आणि फेस मास्क म्हणूनही करता येतो.
लॅव्हेंडर फुलाचा वापर परफ्यूमसाठीही केला जातो.
जर तुमची त्वचा कोरडी होत असेल तर तुम्ही लॅव्हेंडर तेलाचा वापर करु शकता.
तुम्हाला हायपरपिग्मेंटेशनची समस्या असेल तर तुम्ही हे तेल वापरुन पाहू शकता.
लॅव्हेंडर तेलाने थकवा आणि तणावसारख्या, तसेच इतर अनेक समस्या दूर होतात.
चांगली झोप आणि मानसिक आरोग्यासाठी लॅव्हेंडर तेल फायदेशीर असते.
मायग्रेनच्या वेदना कमी करण्यासाठी लॅव्हेंडर तेलाने मसाज करु शकता.
लॅव्हेंडर तेलाने कोलेजन वाढवण्यासही मदत होते.