दैनिक गोमन्तक
वायू प्रदूषणामुळे तुमचे शारीरिक आरोग्यच नाही तर मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.
प्रदूषण त्यांच्या मनाला कसे पोकळ करू शकते हेही बहुतेकांना माहीत नसते. होय! वायू प्रदूषण आणि मानसिक आरोग्य यांचा थेट संबंध आहे.
ब्रिटनमध्ये केलेल्या एका अभ्यासात वायू प्रदूषणाचा मानसिक आरोग्याशी थेट संबंध असल्याचे समोर आले आहे. प्रदुषणामुळे मानसिक आजार खूप गंभीर होऊ शकतो.
वायू प्रदूषणामुळे तुमचे शारीरिक आरोग्यच नाही तर मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.
अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या अहवालानुसार, आतापर्यंत अनेक संशोधनांमध्ये हे समोर आले आहे की, वायू प्रदूषणामुळे लोकांची स्मरणशक्ती कमकुवत होऊ शकते.
त्याचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर आणि वृद्धांवर होतो. एवढेच नाही तर प्रदूषणामुळे नैराश्याचा धोकाही वाढतो.
विषारी हवा तुमच्या फुफ्फुस आणि हृदयासाठीच नाही तर मेंदूसाठीही धोकादायक ठरू शकते.