दैनिक गोमन्तक
चांगल्या आरोग्यासाठी डॉक्टरांकडून नेहमी चालण्याचा सल्ला दिला जातो.
ज्यांना जिममध्ये जाणे शक्य नसते अशा व्यक्तींनी दररोज चालण्याचा व्यायाम केल्यास शरीरास फायदा होतो.
तुम्हाला जर ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर तो कंट्रोलमध्ये येण्यासाठी चालण्याचा व्यायाम जरूर करावा.
दररोज चालण्याचा व्यायाम केल्याने मांसपेशी मजबूत होण्यास मदत होते.तसेच रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे तणावही वाढू लागला आहे. अशा वेळेस चालण्याच्या व्यायामाने हा तणाव दूर होण्यास मदत होते.
जर तुम्ही दररोज चालण्यासाठी जात असाल तर तुम्ही वाढलेले अधिक वजन कमी करू शकता.
रोज ३० मिनिटे चालल्याने शरीराची हाडे मजबूत होतात. तसेच रक्तातील शुगर, कॅन्सरसारख्या आजारांचा धोका कमी होतो.