दैनिक गोमन्तक
ऋतु बदलले की त्याचे आपल्या शरीरावर परिणाम होतात. त्वचेवर देखील वाईट परिणाम होत असल्याचे दिसते. त्यासाठी आपण योग्यवेळी योग्य काळजी घेणे महत्वाचे ठरते.
पुदिना उन्हाळ्यात आपल्यापैकी अनेकांसाठी वरदान ठरत असतो. इतर वेळी पुदिन्याचा आपण विविध खाद्यपदार्थात उपयोग करतो.
पुदिन्याच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट रोसमॅरिनिक अॅसिडचे ( antioxidant rosmarinic acid) प्रमाण जास्त असते. त्यामुळे आपल्या त्वचेचा दर्जा सुधारण्यास मदत होते.
तुमच्या त्वचेला हायड्रेट ठेवण्याचे, रक्ताभिसरण सुरळित चालू ठेवण्यासाठी पुदिना महत्वाचे काम करतो.
तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी देखील पुदिन्याचा उपयोग होतो
यासोबतच, तुमची पचनसंस्था सुरळित चालण्यासाठीदेखील पुदिन्याचा उपयोग होतो.
पुदिन्यामुळे तुमच्या डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास कमी होतो.