दैनिक गोमन्तक
मदनबाण म्हणून ओळखला जाणारा एकेरी पाकळ्यांचा मोगरा हा अधिक लोकप्रिय तसेच अधिक गुणकारी आहे.
चायनामध्ये ग्रीन टीचा स्वाद वाढवण्यासाठी मोगऱ्याच्या फुलाचा वापर केला जातो. तो जास्मिन टी म्हणून ओळखला जातो.
मोगऱ्याच्या तेलाचे दोन थेंब ऍलोव्हेरा लोशनमध्ये टाकून त्वचेवर लावा. तुमची त्वचा नक्की मऊ होईल. आणि तुम्हाला प्रसन्नही वाटेल.
जास्मिन ऑईलचे काही थेंब पेट्रोलियम जेलीमध्ये किंवा नारळाच्या तेलात टाकून त्वचेवरील डाग आणि चट्टे यावर लावल्यास ते दूर होण्यास मदत होते.
जास्मिन टी प्यायल्याने शरीरावरच्या जखमा, व्रण लवकर भरून येण्यास मदत होते.
सनबर्नमुळे त्वचेवर उठलेले पुरळ आणि लालसरपणा जास्मिन टी प्यायल्याने कमी होता.
मोगरा हे नॅचरल कंडीशनर आहे. यासाठी साध्या पाण्यात मोगऱ्याची १० ते १५ फुलं भिजत ठेवा. केस धुवून झाले की शेवटी या पाण्याने केस धुवा.