Manish Jadhav
टोमॅटो हे एक अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट फळ आहे, ते तुमच्या दैनंदिन आहारात समाविष्ट केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.
टोमॅटो आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. टोमॅटोमध्ये विविध जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराचे आरोग्य राखतात.
आज (23 मार्च) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून रोज दोन टोमॅटो खाल्ल्याने काय आरोग्यदायी फायदे मिळू शकतात याबाबत जाणून घेणार आहोत.
टोमॅटोमध्ये लायकोपिन नावाचे अँटीऑक्सिडंट असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
दोन टोमॅटो नियमित खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.
टोमॅटोमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेसाठी फायदेशीर असतात. यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार राहते.
टोमॅटोमध्ये पाणी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते, जे पचनसंस्था निरोगी ठेवते.
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा-कॅरोटीन असते, जे डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर असतात.