दैनिक गोमन्तक
आपल्याला शेतातून अनेकदा चवदार आणि शरीरासाठी पोषक असणाऱ्या रानभाज्या मिळत असतात. मात्र कधीकधी त्या कशा बनवायच्या हे माहीत नसते. आज आपण चूक्याची भाजी कशी करायची हे जाणून घेऊयात.
चुक्याची कोवळी पाने , शेंगदाणे, हरभरा डाळ, लसूण, कांदा, आले, हिरव्या मिरच्या, तेल, जिरे, मीठ हे साहित्य घ्यावे
चुक्याची भाजी स्वच्छ धुऊन कांड्यासहित बारीक चिरावी. शेंगदाणे व हरभरा डाळ एकत्र करून कुकरमध्ये शिजवून घ्यावी.
आले, लसूण ठेचून घ्यावे. कढईमध्ये तेल घालून, जिऱ्याची फोडणी करून त्यात आले-लसूण व बारीक चिरलेली मिरची घालावी.
चिरलेला चुका, मग शिजवलेली डाळ व शेंगदाणे घालावेत. नंतर मीठ घालून मंद आचेवर दहा मिनिटे भाजी शिजू द्यावी.
आजारातून उठल्यावर तोंडाला चव येण्यासाठी ही भाजी अवश्य खायला हवी.
याबरोबरच डोकेदुखीवर चुका व कांद्याचा रस चोळावा.