दैनिक गोमन्तक
ऋतुनुसार अनेक फळे-भाज्या उपलब्ध होत असतात.
जांभूळ-करवंद हे यातील महत्वाची रानफळे आहेत. उन्हाळ्यात उपलब्ध होणाऱ्या या फळांचा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदा आहे.
आंबट-गोड असलेल्या या करवंदाच्या सेवनाने आपले पोटाचे आरोग्य उत्तम राहते.
करवंदाच्या ज्यूसचे सेवन केल्याने शरीरात थंडावा निर्माण होतो. त्यामुळे ज्यांना उष्णतेचा त्रास होतो त्यांना करवंदाचा ज्यूस पिण्याचा सल्ला दिला जातो.
रक्ताताची कमतरता निर्माण झाल्यामुळे जर अशक्तपणा जाणवत असेल तर करवंद फायदेशीर ठरतात.
पिकल्यावर ते खाण्यास योग्य असते. त्याचप्रकारे कच्च्या करंवदाचे लोणचेदेखील खाता येऊ शकते.