दैनिक गोमन्तक
द्राक्षांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक आणि अँटिऑक्सिडन्ट्स असतात.
द्राक्षांच्या सालीमध्ये फायटोन्यूट्रिएंट्स असतात जे आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात.
फायटोन्यूट्रिएंट्स म्हणजे अशी वनस्पती रसायने ज्यामध्ये रोग-प्रतिबंधक संयुगे असतात.
द्राक्षांमध्ये पॉलिफेनॉल्स असते जे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स आहेत..
हे अँटिऑक्सिडंट्स विविध प्रकारचे कर्करोग, अल्झायमर आणि हृदयरोगाशी लढतात.
द्राक्षांमध्ये catechins, quercetin व anthocyanins हे अँटिऑक्सिडंट्स देखील असतात जी कर्करोगाविरूद्ध लढण्यास शरीराची मदत करतात.
त्वचा निरोगी ठेवण्यासाठीसुद्धा द्राक्षे उपयोगी पडतात