दैनिक गोमन्तक
मासे आपल्या आहारासाठी सर्वात फायदेशीर अशा प्रोटीन्स चा स्रोत आहेत.
हे ओमेगा -3 फॅटी ॲसिडस् सारख्या आवश्यक पौष्टिक घटकांनी भरलेले असतात आणि आपल्या शरीराला आणि आपल्या स्नायूंना बळकट करतात.
मासे खाणं केवळ आपल्या हृदयावरच नव्हे तर आपल्या यकृत, मेंदू आणि अगदी झोपेसह आपल्या शरीराच्या इतर कार्यांवर देखील परिणाम करते.
मासे खात असाल तर विसरभोळेपणा कधीच होणार नाही. लहान मुलांची बुध्दी देखील तल्लख होईल.
फिश ऑइल खाण्याने उदासीनतेची लक्षणे कमी झाल्याचे दिसून आलं.
मेंदू आणि शरीराचा थकवा जाऊन मानसिक आरोग्य नक्की सुधारेल
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या म्हणण्यानुसार माशांमध्ये व्हिटॅमिन डी जास्त प्रमाणात असते