दैनिक गोमन्तक
अंड्यामध्ये असलेल्या पोषक तत्वांमुळे कोणीही अंडी खाण्याकडे दुर्लक्ष करूच शकत नाही.
अंडी आरोग्यासाठी आणि त्वचा, केसासाठी फायदेशीर असतात. खाण्याबरोबरच ते त्वचेवर आणि केसांवर लावल्यास देखील फायदेशीर ठरते
सकाळच्या नाश्त्यात अंडी लिंबू किंवा संत्र्या सोबत खावीत, जेणेकरून आपल्या शरीरात व्हिटॅमिन सी देखील मिळेल.
अंड्याच्या पिवळ्या भागामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असते, जेणेकरून रक्त वाढतं, चयापचय वाढतं.
मेंदूच्या विकासासाठी अंड्यांमधील कोलीन खूप महत्वाचे आहे.
कोलीनची कमतरता स्मरणशक्ती कमी करते.
गर्भावस्थेदरम्यान कोलिन ही महिलांसाठी महत्त्वपूर्ण पोषक आहे