दैनिक गोमन्तक
तिळाच्या प्रयोगाने मानसिक विकार कमी होतो, ज्याने तुम्ही तणाव, नैराश्यापासून मुक्त राहता. दररोज थोड्या प्रमाणात तिळाचे सेवन करून तुम्ही मानसिक समस्या टाळू शकता.
तिळाचा प्रयोग चेहर्यावर चमक आणण्यासाठी देखील केला जातो
शरीरातील कोणताही भाग भाजला गेला असेल तर त्या भागात तीळ वाटून त्यात तूप घालून पेस्ट तयार करावी, ती पेस्ट त्या भागास लावल्याने आराम मिळतो.
कोरडा खोकला झाल्यावर तिळाला मिश्री आणि पाण्यासोबत घेतल्याने आराम मिळतो.
हिवाळ्यात, तीळ शरीरात ऊर्जा प्रसारित करते, आणि तेल मालीश वेदनेतून आराम देते.
तीळ दातांसाठी देखील फायदेशीर आहे. सकाळी आणि संध्याकाळी ब्रशिंग नंतर तीळ चावण्याने दात मजबूत होतात,
त्याशिवाय तिळाचे तेल व लसूण उकळून ते तेल कानात घातल्याने कान दुखीत फायदा होतो.