गोमन्तक डिजिटल टीम
सर्दी, खोकला, दमा या आजारांमध्ये मिरे हे एक वरदान ठरते
दात किडण्याची तक्रार काही रुग्णांमध्ये आढळते अशावेळी सुंठ,मिरे, पिंपळी याच्या चूर्णाने दात घासावेत
चेहऱ्यावरील मुरमाचे फोड असतील तर त्यावर मिरा उगाळून लावावा.
स्किन पिगमेंटेशन, रिंकल्स यावर सुद्धा पेपर कॉर्नचे पॅक वापरले जातात.
अग्नि मंद होणे , अन्नाचे पचन न होणे, पोटात गॅस होणे, पोटात दुखणे या सगळ्या पचनसंस्थेच्या तक्रारींवर मिरे उत्तम औषध ठरते
मिऱ्यामध्ये अँटिऑक्सिडंट, अँटिकार्सिनोजेनिक, अँटी-कोलेस्टेरॉल, अनाल्जेसिक, अँटी-इंफ्लेमेटरी, डिटॉक्स हे गुणधर्म आढळून येतात
काळे मिरे पाण्यात किंवा ताकात काही काळ भिजवून त्याची वरची साल काढली, की पांढरे मिरे तयार होतात. या पांढऱ्या मिऱ्यांचं चूर्ण ‘वसंत कल्प’ या आयुर्वेद औषधप्रकारासाठी वापरलं जातं.