Akshay Nirmale
निसर्गाने गोव्याला भरभरून दान दिले आहे. त्यामुळेच इतरही काही प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत असतात.
साओ जेसिंतो आयलँड: हे मुरगाव तालुक्यातील प्रसिद्ध ठिकाण आहे. हे एक बेटच आहे. पण येथे जायला रस्ता आहे. त्यामुळे त्याचे सौंदर्य वाढले आहे.
साओ जेसिंतो आयलँडवरील येथील सेंट हेसिंथ चर्च आणि पोर्तुगीज लाईटहाऊस प्रसिद्ध आहे.
नेत्रावली बबल लेकः नेत्रावली येथील हा कृत्रित तलाव तीनशे ते चारशे वर्ष जूना आहे.
नेत्रावली लेक हा गोपीनाथ मंदिराचा भाग आहे. या तळ्यातून बुडबुडे येत असल्यामुळे या तलावाची चर्चा होते.
चोर्ला घाट: गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवर हा घाट आहे. हा भाग पश्चिम घाट म्हणजे सह्याद्री पवर्तरांगांमध्ये आहे. त्यामुळे येथून वाहनातून फिरण्याचा आनंद अवर्णनीय आहे.
हरवळे धबधबा: उत्तर गोव्यातील घनदाट अरण्यात लपलेला हरवळे धबधबा हे अनेकांचे आवडते पर्यटनस्थळ आहे.