Pranali Kodre
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि अभिनेत्री नताशा स्टॅन्कोविक यांनी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले होते.
त्यानंतर त्यांनी भारतीय पद्धतीनेही लग्न केले.
हार्दिक आणि नताशा यांचा हा लग्न सोहळा उदयपूरमध्ये पार पडला.
दरम्यान, त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.
नुकतेच त्यांनी त्यांच्या हळद आणि मेहंदी समारंभाचे फोटोही शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये हार्दिकने गुलाबी रंगाचा कुर्ता आणि पांढरा पायजमा घातला आहे, तसेच पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे.
त्यांचे हे रोमँटिक फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत.
त्यांच्या फोटोमध्ये दिसते की लग्नसोहळ्यासाठी त्यांचे कुटुंबिय आणि मित्रपरिवारही उपस्थित होता.
तसेच हार्दिक आणि नताशा यांच्यासह त्यांचा अडीच वर्षांचा मुलगा अगस्तही या लग्नसोहळ्यात उपस्थित असल्याचे दिसत आहे.
महत्त्वाचे म्हणजे हार्दिक आणि नताशा यांनी दुसऱ्यांदा केलेले लग्न आहे. त्यांनी 2020 मध्येच पहिल्यांदा लग्न केले होते.
त्यांना 30 जुलै 2020 रोजी पुत्ररत्न देखील प्राप्त झाले असून त्याचे नाव अगस्त्य आहे.