Harbhajan Singh: भारताचा कसोटीतील पहिला हॅटट्रिक हिरो

Pranali Kodre

वाढदिवस

भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग 3 जुलैला त्याचा वाढदिवस साजरा करत आहे.

Harbhajan Singh | Twitter

यशस्वी गोलंदाज

भारताच्या यशस्वी गोलंदाजांमध्ये हरभजन सिंगने नाव घेतले जाते, त्याने अनेकदा भारतीय संघाच्या विजयांमध्ये महत्त्वाचा वाटा उचलला आहे.

Harbhajan Singh | Twitter

पहिली हॅटट्रिक

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील 2001 साली झालेला कोलकाता कसोटी सामना व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांच्या त्रिशतकी भागीदारीसाठी ओळखला जातो, पण याच सामन्यात हरभजनने हॅटट्रिक घेतली होती.

Harbhajan Singh | Twitter

पहिला भारतीय गोलंदाज

कोलकाता कसोटीत हॅटट्रिक घेतल्याने हरभजन भारतीय क्रिकेट इतिहासात कसोटीत हॅटट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला होता.

Harbhajan Singh | Twitter

विश्वविजेत्या संघाचा भाग

हरभजन 2007 टी20 वर्ल्डकप आणि 2011 वनडे वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाचाही भाग होता.

Harbhajan Singh | Twitter

कसोटी कारकिर्द

हरभजनने त्याच्या कसोटी कारकिर्दीत 103 सामने खेळताना 417 विकेट्स घेतल्या आहेत. तो कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारा भारताचा चौथा गोलंदाज आहे. कसोटीत त्याच्या नावावर 2 शतकेही आहेत.

Harbhajan Singh | Twitter

वनडे व टी20 कारकिर्द

हरभजनने वनडेत 236 सामने खेळताना 269 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने त्याच्या कारकिर्दीत 28 आंतरराष्ट्रीय टी20 सामनेही खेळले असून यात 25 विकेट्स घेतल्या आहेत.

Harbhajan Singh | Twitter

आयपीएल कारकिर्द

हरभजनने आयपीएलमध्ये 163 सामने खेळताना 150 विकेट्स घेतल्या आहेत.

Harbhajan Singh | Twitter
Anil Kumble Injury | Dainik Gomantak