Ashutosh Masgaunde
व्यंकटेश प्रसाद यांनी आपल्या कारकिर्दीत 33 कसोटी आणि 161 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने अनुक्रमे 96 आणि 196 विकेट्स घेतल्या आहेत.
व्यंकटेश प्रसाद यांनी 1996 मध्ये आपल्या वयापेक्षा 9 वर्षांनी मोठ्या घटस्फोटित जयंती गुप्ता नावाच्या महिलेशीलग्न केले आहे.
प्रसादने जवागल श्रीनाथ सोबत 1990 च्या दशकाच्या भारतीय संघासाठी दमदार कामगिरी केली आहे. या दोघांच्या जोडीने संघाला अनेक सामने जिंकूण दिले आहेत.
2000-2001 च्या हंगामात, दुखापतीमुळे आणि फॉर्ममध्ये घसरण झाल्यामुळे प्रसादने संघातील स्थान गमावले होते.
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर प्रसाद प्रशिक्षणाकडे वळले. ते 2006 च्या विश्वचषक स्पर्धेत उपविजेते ठरलेल्या भारताच्या अंडर-19 संघाचे प्रशिक्षक होते.
व्यंकटेश प्रसाद यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 1994 मध्ये तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1996 मध्ये पदार्पण केले होते. त्याने दोन्ही प्रकारातून 2005 मध्ये निवृत्ती घेतली.
अलिकडील काळात केएल राहुलच्या फलंदाजीच्या स्टाईल वर प्रसाद यांनी सडकून टीका केल्यानंतर ते पुन्हा एकदा प्रकाशात आले आहेत.