Haircare Tips: केसांची वाढ थांबून थांबणार नाही; 'या' नैसर्गिक टिप्स करा फॉलो

Akshata Chhatre

झोपेचा अभाव

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव, झोपेचा अभाव आणि चुकीच्या आहारामुळे केस गळतीची समस्या वाढत आहे.

Haircare tips|ayurvedic hair tips | Dainik Gomantak

शॅम्पू आणि कंडिशनर

बाजारात उपलब्ध असलेले केमिकलयुक्त शॅम्पू आणि कंडिशनर यामुळे ही समस्या आणखी गंभीर होते.

Haircare tips|ayurvedic hair tips | Dainik Gomantak

हर्बल तेल

केसांना नियमित तेलाने मसाज करणे सर्वात आवश्यक आहे. यामुळे डोक्यातील रक्ताभिसरण सुधारते आणि केसांच्या मुळांपर्यंत पोषण पोहोचते.

Haircare tips|ayurvedic hair tips | Dainik Gomantak

प्रोटीन मास्क

केसांच्या वाढीसाठी प्रोटीन हा अत्यावश्यक घटक आहे. प्रोटीनच्या कमतरतेमुळे केस कमजोर होतात. यासाठी, मोड आलेले कडधान्य, मेथीच्या बिया आणि दह्याचे मिश्रण करून एक प्रोटीन मास्क तयार करा.

Haircare tips|ayurvedic hair tips | Dainik Gomantak

घरगुती शॅम्पू

बाजारातील शॅम्पूमध्ये जास्त रसायने असतात, ज्यामुळे केस कोरडे आणि कमजोर होतात. त्याऐवजी, आवळा आणि रीठा पावडर पाण्यात उकळून तयार केलेले पाणी शॅम्पूप्रमाणे वापरणे अधिक फायदेशीर ठरते.

Haircare tips|ayurvedic hair tips | Dainik Gomantak

तांदळाचे पाणी

तांदूळ रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी त्याचे पाणी केसांवर वापरा. यातील अमिनो आम्ल आणि जीवनसत्त्वे केस मऊ, चमकदार आणि मजबूत करतात.

Haircare tips|ayurvedic hair tips | Dainik Gomantak

तेजपत्त्याचे पाणी

तेजपत्ता पाण्यात उकळून त्याचे गाळलेले पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरा. रात्री झोपण्यापूर्वी केसांच्या मुळांवर हे पाणी शिंपडल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि केसांची वाढ जलद होते.

Haircare tips|ayurvedic hair tips | Dainik Gomantak

Realtionship Tips: ऑफिस अफेअर ठरू शकते धोक्याची घंटा!! सावध व्हा

आणखीन बघा