Akshata Chhatre
हल्ली केसगळती ही इतकी सामान्य समस्या झाली आहे की, ती कोणत्याही वयात कुणालाही भेडसावते.
लहान वयात केस विरळ होणे, वेळेआधी टक्कल दिसू लागणे किंवा कंगवा फिरवल्यावर मोठ्या प्रमाणात केस हातात येणे हे चित्र अनेक घरांमध्ये दिसते.
महागडी तेलं, शाम्पू वापरूनही केसगळती थांबत नाही, उलट तणाव वाढतो.
यामागचे मूळ कारण म्हणजे अपुरी झोप, ताणतणाव, प्रदूषण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोषणाची कमतरता.
रोज सकाळी एक चमचा ताजा आवळ्याचा रस कोमट पाण्यात मिसळून प्या. यातला व्हिटॅमिन C केसगळती रोखतो, नवीन केसांची वाढ करतो आणि नैसर्गिक काळेपणा टिकवतो.
बीटरूटमध्ये प्रथिने, लोह, फॉलिक अॅसिड व अँटीऑक्सिडंट्स असतात. नियमित सेवन केल्याने रक्ताभिसरण सुधारते, केसांना चमक येते आणि विषारी घटक बाहेर टाकले जातात.
आल्यातील जिंजेरॉल पचन सुधारते आणि सूज कमी करते. दररोज अर्धा चमचा आल्याचा रस मधात मिसळून घेतल्याने केवळ केस नव्हे तर त्वचा व एकंदर आरोग्य सुधारते.