Akshata Chhatre
आधुनिक जीवनशैलीमुळे वाढलेला ताणआणि अपुऱ्या झोपेमुळे अनेकदा केस गळणे, केसांची वाढ खुंटणे किंवा ते कमकुवत होणे अशा समस्या सामान्य झाल्या आहेत.
बाजारातील महागड्या उत्पादनांऐवजी केसांची निगा राखण्यासाठीसर्वात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे तेल लावणे
भारतीय परंपरेनुसार, केसांना रात्री तेल लावणे ही पद्धत खूप जुनी आहे. यामागे एक महत्त्वाचे कारण आहे. रात्री झोपताना शरीर पूर्णपणे विश्रांतीच्या स्थितीत असते.
तेलातील पोषक तत्वे केसांच्या मुळांपर्यंत आणि त्वचेत खोलवर शोषली जातात. रात्रीच्या वेळी केलेला हलका मसाज तणाव कमी करण्यास आणि चांगली झोप लागण्यास मदत करतो.
जर तुम्हाला रात्री तेल लावण्यासाठी वेळ मिळत नसेल, तर दिवसाही तुम्ही हा उपाय करू शकता.
विशेषतः सुट्टीच्या दिवशी किंवा घरी असताना, केस धुण्यापूर्वी १ ते २ तास आधी तेल लावणे फायदेशीर ठरते.
केस धुण्यापूर्वी फक्त १५ मिनिटे आधी जरी तेल लावले तरी त्याचा चांगला परिणाम दिसून येतो.